देशाच्या शाश्‍वत विकासासाठी भाजपा सरकार सत्तेतून बाहेर जाण्याची गरज- नायडू

नवी दिल्ली – देशाच्या शाश्‍वत आणि समतोल विकासासाठी भाजपाचे सरकार शक्‍य तितक्‍या लवकर सत्तेतून बाहेर जाण्याची गरज असल्याचे आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नायडू यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या दोन्ही नेत्यांमध्ये नेमका कशा संदर्भात चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या काही महिन्यांपासून नायडू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेत आहेत. राष्ट्रीय स्तरावर महाआघाडी स्थापन करण्यासाठी देलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख पक्षनेत्यांच्या भेटीचा कार्यक्रम सुरू केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंद्राबाबू नरेंद्र मोदींचे सरकार उलथून टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. विरोधकांची एकजूट येत्या लोकसभा निवडणुकात महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. नायडू यांनी डिसेंबर महिन्यात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.

राहुल गांधी, शरद पवार, फारुख अब्दुल्ला, मायावती, अखिलेश यादव, सिताराम येचुरी, ममता बॅनर्जी यांच्या भेटी त्यांनी घेतल्या. आता परत एकदा त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. ते आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)