मिस इंडिया मानसी सेहगलचा ‘आप’मध्ये प्रवेश

नवी दिल्ली – माजी मिस इंडिया दिल्ली, मानसी सेहगल हिने आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांच्या उपस्थितीत तिचा हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी बोलताना ती म्हणाली की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्या प्रामाणिकपणे सरकार चालवले आहे त्यातून प्रेरणा घेऊन आपण आम आदमी पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही देशाचा खरा विकास व्हायचा असेल तर तेथील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था उत्तम असली पाहिजे. त्यानुसार केजरीवाल सरकारने उत्तम काम करून दिल्ली राज्यात या दोन्ही क्षेत्रात मोठा बदल घडवून दाखवला आहे.

प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारण करून आपण व्यवस्था बदल करू शकतो हे आम आदमी पक्षाने दाखवून दिले आहे. त्यामुळे मी राजकारण प्रवेशासाठी हा पक्ष निवडला आहे असे तिने म्हटले आहे. युवक आणि महिलांनी आम आदमी पक्षात सहभागी होऊन राजकारणात बदल घडवून आणावा असे आवाहनही त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.