#NZvIND : न्यूझीलंडचा भारतावर 4 धावांनी विजय

-तीन सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने गमावली
-कार्तिक, कृणालची झुंज अपयशी
-कॉलिन मुन्‍रोला सामनावीराचा पुरस्कार
-यष्टीरक्षक फलंदाज टीम सेयफर्ट मालिकावीर

हॅमिल्टन – तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 4 धावांनी पराभव करताना मालिका 2-1 अश्‍या फरकाने आपल्या नावावर करत भारताचे पहिल्या मालिका विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारीत 20 षटकांत 4 बाद 212 धावांची मजल मारुन भारतीय संघासमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य थेवले होते. मात्र, 213 धावांचा पाठलाग करताना भारताला निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 208 धावांपर्यंतच मजल मारता आल्याने भारताने हा सामना 4 धावांनी गमावला.

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या दोन सामन्यात 1-1 बरोबरी झाली होती. न्यूझीलंडने दिलेल्या 213 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन केवळ 5 धावा करून बाद झाला.

तर, त्यानंतर आलेल्या विजय शंकर आणि कर्णधार रोहित शर्माने धावगती कायम राखत फटकेबाजी केली. यावेळी रोहित पेक्षा विजय आकर्षक फटकेबाजी करत होता. शंकर आपले अर्धशतक पुर्ण करेल असे वाटत असताना तो बाद झाला. विजयने 28 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. तर, कर्णधार रोहित शर्माच्या साथीत त्याने 7.4 षटकांत 75 धावांची भागिदारी केली.

सॅंटनरच्या गोलंदाजीवर शंकर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने 12 चेंडूत 1 चौकार 3 षटकारांसह 28 धावांची वादळी खेळी केली. पंत बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्याने षटकारानेच सुरुवात केली. यावेळी सुरुवातीपासून संयमी खेळणारा कर्णधार रोहित शर्मा 32 चेंडूत 38 धावा करून परतला.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ हार्दिक पांड्याही 11 चेंडूत 21 धावा करून परतला. तर, आपला तिनशेवा टी-20 सामना खेळणाऱ्या धोनीही केवळ 2 धावा करुन परतल्याने मजबूत स्थितीत असणाऱ्या भारताच्या एकामागून एक 3 गडी बाद झाल्याने बॅकफूटवर गेला. यानंतर आलेल्या दिनेश कार्तिक आणि कृणाल पांड्या यांनी भारताचा डाव सावरला.

दोघांनी आक्रमक फलंदाजी करत शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावांपर्यंत अशा स्थितीत आणले. परंतु साउदीच्या अखेरच्या षटकात भारताला केवळ 11 धावाच करता आल्या. त्यातल्या त्यात या षतकांत दिनेश कार्तिकने तिसऱ्या चेंडूवर धाव न काढण्याचा निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. यावेळी दिनेश कार्तिकने 16 चेंडूत चार षटकारांसह 33 धावा केल्या. तर कृणाल पांड्याने 13 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 26 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करनाऱ्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व राखले. यावेळी सलामीवीर सेयफर्टने 43 धावा करत मुन्‍रोच्या साथीत 7.4 षटकांत 80 धावांची सलामी दिली. तर, दुसरा सलामीवीर कॉलिन मुन्‍रोने चौफेर धुलाई करत 40 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली.

यानंतर कर्णधार विल्यमसनने 27 धावांची खेळी केली. तर, फटकेबाजी करणाऱ्या कॉलिन डी ग्रॅंडहोमला भुवनेश्‍वरनेबाद केले. यानंतर डेरिल मिशेल आणि रॉस टेलर यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत न्यूझीलंडला 212 धावांची मजल मारुन दिली.

न्यूझीलंड फलंदाजी :

भारतीय फलंदाजी :

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)