मुंबई : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला मिळालेल्या जनादेशाबाबद्दल शरद पवार यांनी ट्विट केले आहे. आम आदमी पक्ष आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन शरद पवार यांनी केले आहे.
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्षाला ६३ जगावर तर भाजपला ७ जागावर आघडीवर आहेत. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला आपले खातेही खोलाता आले नाही.