राजदकडून लढणार शत्रुघ्न सिन्हा!

नवी दिल्ली – प्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी रांची येथे राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. यामुळे सिन्हा हे राजदकडून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते असलेल्या सिन्हा यांनी रांची येथील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) रुग्णालयात लालूप्रसादांची भेट घेतली. यावेळी कॉंग्रेस आणि झारखंड मुक्‍ती मोर्चा (जेएमएम) या पक्षाचे नेतेही त्यांच्या सोबत होते. चारा गैरव्यवहारात दोषी ठरल्यानंतर लालूप्रसाद यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लालूप्रसाद हे अनेक आजारांना तोंड देत असून ते सध्या येथे आहेत. मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांशीही मी बोललो. यावेळी राजकारणावर चर्चा झाली नाही,असे सिन्हा यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते सुबोधकांत सहाय हे सिन्हा यांच्यासोबत होते. लालूप्रसादांचे धाकटे चिरंजीव तेजस्वी यादव हे एक उत्तम आणि गुणी युवक आहेत. ते बिहारचा चेहरा आहेत, अशी प्रशंसाही सिन्हा यांनी केली. लालूप्रसादांच्या पक्षाकडून आपण निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. मी भाजपचा शत्रू नाही, मात्र सर्व पक्षांचा मित्र आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)