पटना – बिहारचे माजी मुख्यमंत्री व हिंदुस्थान आवाम मोर्चाचे सर्वेसर्वा जितन राम मांझी आपल्या वक्तव्यामुळे सध्या काँग्रेस व राजद नेत्यांच्या टीकेचे धनी ठरतायेत. मांझी यांनी, काँग्रेस नेते राहुल गांधी व राजद प्रमुख तेजस्वी यादव वारंवार ‘हनीमूनवर’ जातात अशी टीका केली.
याबाबत सवसितर वृत्त असे की, बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए सरकारचा भाग असलेल्या हिंदुस्थान आवाम मोर्चाची आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर मांझी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी, तेजस्वी यादव व चिराग पासवान यांच्यावर शरसंधान साधले.
“मी म्हणेन, राहुल गांधी, तेजस्वी यादव व चिराग पासवान हे तिन्ही युवराज अपरिपक्व आहेत. जेव्हा-केव्हा त्यांचं देशात अथवा राज्यात असणं आवश्यक असतं तेव्हा तेव्हा ते बाहेर ‘हनिमून’चा आनंद लुटत असतात.” असं मांझी म्हणाले.
मांझी यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते राजेश राठोड यांनी, मांझी यांना त्यांचे पुत्र काही वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये महिलेसोबत सापडल्याच्या घटनेची आठवण करून देत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
तर दुसरीकडे राजदने, मुलगा हॉटेलमध्ये अन्य महिलेसोबत सापडल्यानंतर मांझी यांनी याप्रकरणी दिलेल्या प्रतिक्रियेची आठवण करून दिली आहे. ही घटना घडल्यानंतर मांझी यांनी त्यावेळी, ‘दोन वयस्क व्यक्ती परस्पर सहमतीने एकत्र येत असतील तर त्यात काही गैर नाही’ अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या याच वक्तव्याच्या बातम्या राजदने आपल्या अधिकृत खात्यावर शेअर केल्या आहेत.
दरम्यान, राहुल गांधी व तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधण्याच्या नादात मांझी यांनी आपलीच नाचक्की करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शादीशुदा बेटा सेक्स स्कैंडल में होटल में गर्लफ्रेंड के साथ पाया गया तो क्या गलत है?- तत्कालीन मुख्यमंत्री जीतन राम माँझी
90% मर्द गैर की बीवी को डेट करते है। दूसरे की बीवी से अफेयर में क्या बुराई?- जीतन राम माँझी, पूर्व मुख्यमंत्री pic.twitter.com/PKUNeJ1hni
— Shakti Singh Yadav (@sshaktisinghydv) January 7, 2021