करोनामुळे विकास दर उणे 7.7 % होणार; केंद्र सरकारचा अंदाज

नवी दिल्ली – 2020-21 या आर्थिक वर्षाचा विकास दर करोनामुळे कमी होऊन उणे 7.7 टक्के होणार आहे. गेल्या वर्षाचा विकास दर 4.2 टक्के इतका होता. पहिल्या तिमाहीचा विकास दर उणे 23.9 टक्के झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर उणे 7.5 टक्‍के आहे.

उरलेल्या दोन तिमाहीतील विकास दर वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एकूण वर्षाचा विकास दर उणे 7.7 टक्के होईल असे या विभागाला वाटते. मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राचा विकास दर उणे 9.4 टक्के होण्याची शक्‍यता आहे.

गेल्या वर्षी या क्षेत्राचा विकासदर 0.03 टक्‍के इतका होता. खाण, व्यापार, हॉटेल वाहतूक, दूरसंचार आणि सेवा क्षेत्राच्या विकास दरावर परिणाम झाला आहे. यावर्षी कृषी क्षेत्राचा विकास दर मात्र 3.4 टक्के होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राचा विकासदर चार टक्के होता.

बहुतांश पतमानांकन संस्थांनी या वर्षाचा विकास दर उणे दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी होईल असे सुरुवातीला म्हटले होते. मात्र नंतर भारतीय अर्थव्यवस्थेने वेगात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता या सर्व पतमानांकन संस्था विकासदराचे भाकीत बदलत आहेत. सरकारने या वर्षाचा विकास दर 7.7 टक्‍के होईल असे म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.