पॉर्नस्टार मिया खलिफाच्या चाहत्यांसाठी एक “बॅड न्यूज’ आहे. आपल्या आवडत्या हिरोईनचे लग्न ठरले की तिच्या चाहत्यांना वाईट वाटतेच. तसेच आता पॉर्नस्टार मिया खलिफा ही लवकरच पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे.
मियाने काही दिवसांपूर्वीच तिचा स्वीडीश बॉयफ्रेंड रॉबर्ट सेंडबर्ग याच्यासोबत साखरपुडा केला आहे. मियाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना लग्नाची माहिती दिली. मियाने तिचा व रॉबर्टचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून मी जगातली सर्वात लकी मुलगी आहे, अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे मियाच्या लाखो चाहत्यांचे “हार्ट ब्रेक’ झाले आहे. आता तिच्या फॅन्सना मियाच्या वेडिंग डेस्टिनेशनचे इन्व्हिटेशन मिळते का, याची वाट बघत बसायला लागणार आहे.
मियाने 2015 साली पॉर्न इंडस्ट्री सोडली असून ती आता फक्त मॉडेलिंग करते. याशिवाय काही म्युझिक अल्बममुळेही ती खूप प्रसिद्ध झाली होती. तिने परफॉर्मन्स केलेला “स्कॅन फिट एमआयएमई’ हा म्युझिक अल्बम खूप हिट झाला होता. यू ट्युबवर या व्हिडीओचा आणि त्याच्या म्युझिक रिमेकचा ट्रेन्डच प्रस्थापित झाला होता. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात हे गाणे रिलीज झाले होते. मिया इन्स्टाग्रामवर सर्वाधिक ऍक्टिव्ह असते. आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल अशा प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा अपडेट ती इन्स्टाग्रामवर देत असते. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर दीड कोटीपेक्षा जास्त फॅन आहेत. अर्थात पॉर्न फिल्ममध्ये काम करणे सोडले असले तरी तिचे हे हॉट फोटो प्रचंड क्रेझ निर्माण करत आहेत. दरम्यान, मियाने काही वर्षांपूर्वी हिजाब घालून पॉर्न व्हिडीओ शूट केला होता. त्यावरून इसिसने तिचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली होती.