वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ऍक्ट्रेसच्या लिस्टमध्ये एक नवीन नाव तारा सुतारियाचे देखील सामील झाले आहे. करण जोहरचा चित्रपट ‘स्टुडेंट ऑफ द इयर 2’पासून तिने आपले करिअर सुरू केले आहे. ऍक्टिंग सोबतच तारा, आपल्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. तारा सुतारिया प्रोफेशनली सिंगर आणि बेलेट डान्सर आहे. तिने क्लासिकल डान्स, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची ट्रेनिंग घेतली आहे. तारा व्हिडीओ जॉकी (वीजे) देखील आहे. तिने डिजनीचे ‘द सूट लाईफ ऑफ करण एन्ड कबीर’, ‘ओए जस्सी’ सारख्या बऱ्याच शोमध्ये काम केले आहे. ताराने सिंगर म्हणून हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायचे चित्रपट ‘गुजारिश’साठी गाणे म्हटले आहे. एवढंच नव्हे तर तिने आमिर खानचे चित्रपट ‘तारे जमीन पर’ आणि ‘डेविड’मध्ये देखील गाणे गायले आहे.
साल 2008 मध्ये तारा सुतारिया पोगो अमेजिंग किड्स अवॉर्डसमध्ये सिंगर कॅटेगरीत सातव्या क्रमांकावर होती. ताराचे नाव आधी हॉलिवूडच्या एका चित्रपटासाठी कास्ट करण्यात येणार होते पण नंतर तिची जागा एक्ट्रेस नाओमी स्कोटने घेतली. करण जोहरने तिची निवड “स्टुडंट ऑफ द इयर 2′ साठी केली ती अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमेडी सिरीयल “द सूट लाईफ ऑफ झॅक ऍन्ड कोडी’मध्ये तिला बघितल्यानंतर. त्याच्या दृष्टीने तारा सुतारिया हे नाव यावर्षीची तारा म्हणून फिक्स झाले होते. ताराला पिया सुतारिया नावाची जुळी बहीण देखील आहे. आज तारा एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्थिरावू पाहते आहे.
पण तिला खऱ्या अर्थाने शेफ बनण्याची इच्छा होती. वयाच्या 13 व्या वर्षी तिने रिऍलिटी टॅलेंट शो मध्ये भाग घेतला होता. फराह खान आणि अनू मलिक हे त्याचे परीक्षक होते. ताराने सादर केलेल्या ऑपेराच्या सादरीकरणाला सर्वांनी’स्टॅन्डिंग ओव्हेशन’ दिले होते. दिवंगत अभिनेते विनोद खन्नांचा मुलगा रोहन मेहराबरोबर तिचे अफेअर असल्याचे समजते आहे.