मर्लिन मुनरोचा पुतळा गेला चोरीला

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरोचा पुतळा लॉस अँजेलिसमधील हॉलिवूड आर्ट स्पेसमधून चोरीला गेला आहे. हा पुतळा पेंटेंड स्टेनलेस स्टीलसोबत ऍल्युमिनियमचा वापर करून बनविला होता. लॉस अँजेलिसच्या पोलिसांनी हरवलेल्या पुतळ्याचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. मात्र, अद्याप या पुतळ्याची चोरी कोणी केली याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

लॉस अँजोलिसचे काउंसिलमॅन मिच आफॅरेलने केएनबीसी टिव्हीला सांगितले आहे की, आमच्याकडे साक्षीदार आहे ज्याने कोणाला तरी स्टॅच्युवर चढताना पाहिले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीला तो स्टॅच्यु आणि बॅग घेऊन पळताना पाहिले आहे. अद्याप या बॅगेत काय होते ते समजू शकले नाही.

मर्लिन मुनरो हॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नावजली जाते. तिचे सौंदर्य, ग्लॅमर व प्रेमाचे किस्से आणि अचानक झालेल्या मृत्यूमुळे ती खूप चर्चेत आली होती. मुनरोचे नाव अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन कैनेडी यांच्या सोबत जोडले गेले होते. ती बऱ्याच लोकांसोबत लग्नबेडीत अडकली पण ती अयशस्वी ठरली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)