देशात लोकशाहीच्या उत्सवाला जोरदार सुरवात
नवी दिल्ली – 2019 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार सुरवात झाली आहे. आता पर्यंत अनेक दिग्ज नेत्यांनी आणि खेळाडूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांतील 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. सहाव्या टप्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे.
Voting percentage till 9 am: Bihar-9.03, Haryana- 3.74, Madhya Pradesh- 4.01, Uttar Pradesh- 6.86, West Bengal- 6.58, Jharkhand- 12.45, Delhi- 3.74 #LokSabhaElections2019 #Phase6 pic.twitter.com/4eABmlf91x
— ANI (@ANI) May 12, 2019
सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे-
- दिल्ली – 3.74 टक्के
- बिहार – 9.03 टक्के
- हरियाणा – 3.74 टक्के
- झारखंड – 12.45 टक्के
- मध्यप्रदेश – 4.01 टक्के
- उत्तरप्रदेश – 6.86 टक्के
- पश्चिम बंगाल – 6.58 टक्के