बॉलिवूड अॅक्टर सैफ अली खान त्याच्या आगामी चित्रपटात नागा साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि त्याच्या या चित्रपटाचे नाव आहे ‘लाल कप्तान’. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये ‘सरताज सिंग’ची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या वाट्याला आणखी एक दमदार भूमिका आली असून, प्रेक्षकांमध्येही आतापासूनच त्याविषयीची बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.
‘लाल कप्तान’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सैफ अली खान नागा साधूंच्या रुपात दिसत आहे. कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा नागा साधूंचा लुक या पोस्टरमध्ये पाहायला मिळाला आहे. चित्रपटाची कथा सूड आणि विश्वासघातावर आधारित आहे.
Saif Ali Khan in #LaalKaptaan… Release date finalized: 6 Sept 2019… Directed by Navdeep Singh… Eros International and Aanand L Rai presentation… Here's the first look poster: pic.twitter.com/OeAKrLhWEN
— taran adarsh (@taran_adarsh) May 20, 2019
पोस्टरसह या चित्रपाटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील प्रदर्शित करण्यात आली आहे. नवदीप सिंग दिग्दर्शित हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इरॉस इंटरनॅशनल’ आणि आनंद एल.राय सादरकर्ते असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती ‘कलर यल्लो’ या निर्मिती संस्थेकडून करण्यात येत आहे.