विरोधक एकवटले; ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची 100 टक्के पडताळणी करण्याची मागणी

नवी दिल्ली: देशात ईव्हीएम मशीन संशयी परिस्थितीत अनधिकृतपणे आढळल्यामुळे विरोधी नेत्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसोबत हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप केला. बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे महाआघाडीचे उमेदवार अफजल अन्सारी यांनी ईव्हीएमची अदलाबदली केली जात असल्याचा आरोप केला. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरुन संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएमसोबत छेडछाड करणं फोन टॅप करण्याइतकं सोपं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

आज दुपारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 19 विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय विरोधी नेत्यांनी घेतला. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची 100 टक्के पडताळणी करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)