पोलीस मार्शलचे अपहरण करून मारहाण

पुणे – नंबर प्लेट नसलेल्या कारवर कारवाई करताना सिंहगड पोलीस ठाण्यातील मार्शलचे अपहरण करण्यात आले. त्यांना दोन तास कारमध्ये फिरवून जबर मारहार करण्यात आली. तसेच महामार्गावरील पुलावरून खाली टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधित कारचालकाचा व त्याच्या साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

ही घटना रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास सिंहगड रोड परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सचिन सर्जेराव तनपुरे (वय 35, रा. सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तनपुरे हे सिंहगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तनपुरे व त्यांचा सहकारी शिंदे असे दोन्ही बीट मार्शल रात्रगस्तीवर होते. त्यावेळी सिंहगड रस्त्यावरील हॉटेल निखारासमोर पाठीमागे नंबर प्लेट नसलेल्या कारबाबत तनपुरे व त्यांच्या सहकाऱ्यास संशय आला. कारचा दरवाजा उघडल्यानंतर रानवडे, मते व त्यांच्या एक साथीदार असे तिघेजण मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले. तनपुरे यांनी त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रानवडेने तनपुरे यांना शिवीगाळ केली, तर शिंदे यांना धक्‍काबुक्‍की केली. त्यामुळे तनुपरे यांनी त्यांच्या कारमध्ये बसून त्यांना अभिरुची पोलीस चौकीमध्ये गाडी नेण्यास सांगितले. त्यावेळी कार चालविणाऱ्या रानवडेने कार अभिरुची पोलीस चौकीकडे न घेता प्रयेजा सिटीकडून मुंबई-बंगळुरू महामार्गावर कार घेतली. त्यानंतर फिर्यादी तनपुरे यांना शिवीगाळ व मारहाण करून उड्डाणपुलावरून खाली टाकून देण्याची धमकी दिली.

रानवडे याने फिर्यादीकडील वॉकीटॉकी व मोबाइल काढून घेतला. तसेच फिर्यादीस शिवीगाळ, मारहाण करीत असताना मोबाइलवर व्हिडीओ चित्रीकरण करण्यास आले. त्यानंतर फिर्यादी यांना जबरदस्तीने बावधन येथे नेऊन रस्त्यावर सोडून देत पलायन केले. त्यांना तब्बल दोन तास 20 ते 25 किलोमीटर गाडीतून फिरवण्यात आले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या मार्शलशी संपर्क साधून पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड करत आहेत. पोलिसांनी जगन्नाथ दिनबंधू राय नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तो मजुरी काम करत असून त्यांचे दोन साथीदार फरार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)