#Video : शहीदांचा अपमान करणाऱ्या भाजपला जनता नक्कीच धडा शिकवेल – जयंत पाटील

पुणे – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मध्य प्रदेशमध्ये भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आणि वाद सुरू झाला. त्यातच आता साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर समाज माध्यमातून चौफेर टीकेची झोड उठली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीसुध्दा भाजप आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर याच्यांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “ज्या शहीद हेमंत करकरेंनी या देशासाठी बलिदान दिले, त्यांच्याविषयी अशी भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञा या आरोपी महिलेस उमेदवारी देणाऱ्या भाजप सरकारला या देशात यापुढे कसे राजकारण करायचे आहे हे स्पष्ट दिसते आहे. शहीदांचा अपमान करणाऱ्या भाजपला जनता नक्कीच धडा शिकवेल.”

शहीदांचा अपमान करणाऱ्या भाजपला जनता नक्कीच धडा शिकवेल – जयंत पाटील

शहीदांचा अपमान करणाऱ्या भाजपला जनता नक्कीच धडा शिकवेल – जयंत पाटीलसाध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीसुध्दा भाजप आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर याच्यांवर टीका केली आहे….. सविस्तर वाचा…. https://bit.ly/2PiMJlu

Posted by Dainik Prabhat on Friday, 19 April 2019

साध्वींच्या हेमंत करकरेंबद्दल ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार

दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, ‘हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारलं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)