नवी दिल्ली – चौथ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला 10,362 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षातील चौथ्या तिमाहीच्या तुलनेत हा नफा 9.8 टक्क्यांनी जास्त आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रात या तिमाहीत कंपनीला फटका बसला असला तरी रिटेल आणि दूरसंचार क्षेत्रातून महसूल वाढल्याने कंपनीचा नफा वाढण्यास मदत झाली आहे.
गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीला 9,438 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा महसूल 19.4 टक्क्यांनी वाढवून 1 लाख 54 हजार 110 कोटी रुपये इतका झाला आहे.रिटेलमतील नफ्यात 77 टक्के वाढवून तो 1923 कोटी रुपये झाला आहे.