बॉलिवूडने ही जागवल्या ‘जेट एरवेज’ च्या आठवणी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या ‘जेट एरवेज’ ने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सुमारे २० हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. ‘जेट एरवेज’ वर ८ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त कर्जभार असल्या कारणामुळे शेवटी कंपनीला टाळे लागले. कंपनी व्यवस्थापनाच्या गचाळ कारभारामुळेच ही परिस्थिती आल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

जेट एरवेजने आपली सेवा बंद करत असल्याच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. उत्तम दर्जाची सेवा देणाऱ्या कंपनीला टाळे लागल्यामुळे बॉलिवूडकरांनी देखील हळहळ व्यक्त करत, ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.