कंगणापठोपाठ काजोलही साकारणाऱ्‌ जयललिता

कंगणा रणावत काही दिवसांनी तामिळनाडूच्या दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे आणि या सिनेमाचे तमिळमधील नाव “तलाइवी’ आणि हिंदीमध्ये “जया’ असे असणार आहे, असे समजले होते. आता जयललिता यांच्या जीवनावर आणखी एक सिनेमा येणार असल्याची बातमी पुढे आली आहे. या सिनेमाचे नाव “शशिललिता’ असणार आहे. या सिनेमासाठी निर्मात्यांनी लीड रोलसाठी काजोलला विचारले आहे. तर जयललिता यांची जवळची मैत्रिण शशिकलाच्या रोलमध्ये अमला पॉलला घेण्याची चर्चा सुरू आहे.

मात्र या संदर्भात काजोल किंवा अमला पॉलकडून कोणतेही कन्फर्मेशन दिले गेलेले नाही. हा सिनेमा दोन भागांमध्ये बनेल, असेही ठरले आहे. तमिळनाडूच्य माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यावर 6 बायोपिकची घोषणा आतापर्यंत करण्यात आली आहे. “आयरन लेडी’नावाच्या एका बायोपिकमध्ये जयललितांचा रोल नित्या मेनन करणार आहे. याशिवाय राम गोपाल वर्मा आणि भारतीराजा यांनीही जयललिता यांच्यावरच्या एका बायोपिकची घोषणा केलेली आहे. अन्य बायोपिकमध्ये कोण कोण ज्यललितांचा रोल करणार हे अद्याप पुढे आलेले नाही. ती माहितीही लवकरच पुढे येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here