विमा, हेल्थकेअर आणि औषधे; पोर्टफोलियोला द्या बूस्टर डोस (भाग-३)

विमा, हेल्थकेअर आणि औषधे; पोर्टफोलियोला द्या बूस्टर डोस (भाग-१)

विमा, हेल्थकेअर आणि औषधे; पोर्टफोलियोला द्या बूस्टर डोस (भाग-२)

ठळक गोष्टी :
– वाढती जागरूकता.
– वाढतं उत्पन्न.
– नोटबंदीमुळं निर्माण झालेली संघटित परिस्थिती.
– बदललेल्या जीवनशैलीमुळं जडणारे रोग.
– कोणत्याही रोगावरील तात्काळ निदान.
– कोणत्याही रोगावरील सहज प्रतिबंधात्मक निराकरण.
– सहज उपलब्ध असणारा आरोग्यविमा.
– जगातील सर्वांत मोठी सरकारी योजना, आयुष्यमान भारत’.

या क्षेत्रातील नोंदणीकृत अशा कांही अग्रगण्य कंपन्या म्हणजे अपोलो हॉस्पिटल्स, फोर्टिस हेल्थ, नारायण हृदयालय, थायरोकेअर, सिमेन्स, इ.

आता या क्षेत्रांना संलग्न असं अजून एक क्षेत्र म्हणजे औषध क्षेत्र (Pharmaceuticals).
जागतिक स्तरावर भारत हा जेनेरिक औषधांमध्ये सर्वात मोठा पुरवठादार असून हे क्षेत्र जागतिक स्तरावरील विविध प्रकारच्या लशींच्याच्या मागणीच्या 50% मागणी पूर्ण करतं तर जेनेरिक औषधांच्या बाबतीत अमेरिकेच्या एकूण मागणीच्या 40 % तर इंग्लंडच्या मागणीच्या 25% मागणी पूर्ण करतं. सद्य परिस्थितीत एड्‌स साठी वापरली जाणारी अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स पैकी 80 टक्क्‌यांपेक्षा जास्त औषधं पुरवण्याचं काम एकटा भारत करतोय. आताच्या घडीस, भारतातील ह्या क्षेत्रातील निर्यात साधारणपणे 15.52 अब्ज अमेरिकी डॉलर्स असून देशांतर्गत खप हा 1,30,000 कोटी रुपयांच्या वर आहे. जर मागील वर्षांत हे क्षेत्र काहीसं नापसंतीस उतरलेलं होतं तरी बचावात्मक दृष्टीकोनातून चांगल्या निवडक कंपन्यांत गुंतवणूक केल्यास या क्षेत्रात देखील संधी दडलेल्या आहेतच.

काही ठळक गोष्टी : कमी उत्पादनखर्च
सरकारचं फार्मा व्हिजन 2020′, ज्याद्वारे भारतास उत्पादनात जगात नं. 1 स्थानावर घेऊन जाण्याचं उद्दिष्ट.
भारतीय कंपन्यांनी त्यांच्या एकूण विक्रीच्या 9% गुंतवणूक ही संशोधन व विकासावर केल्याचं निष्पन्न.
औषधांवरील खर्चातील वाढ ही येत्या 5 वर्षांत 9 ते 12 टक्के वाढण्याचा अंदाज.
या क्षेत्रातील नोंदणीकृत अशा कांही कंपन्या – बॉट, अजंठा, आलेम्बिक, अल्केम, ऑरोबिंदो, स्ट्राझेनेका, कॅडिला, डॉ.रेड्डीज, ग्लॅक्‍सोस्मिथलाईन, लुपिन, फायजर, टॉरंट,इ

एकूणच या तीन क्षेत्रांचा आवाका पाहता या क्षेत्रांमधील उत्तम कंपन्यांमध्ये योग्य वेळेस केलेली गुंतवणूक आपल्या पोर्टफोलिओसाठी एक नक्कीच उत्तम बूस्टर डोस ठरेल यात वाद नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here