शेअर निर्देशांकांत झाली वाढ

इंडियाबुल्स फायनान्स व जेट एअरवेजचे शेअर कोसळले

मुंबई  – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय शेअरबाजारात निवडक खरेदी होत आहे. त्यामुळे मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअरबाजार निर्देशांकांत बरीच वाढ झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 165 अंकांनी वाढून 39,950 अंकावर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 42 अंकांनी वाढून 11,965 अंकांवर बंद झाला. तेल आणि नैसर्गिक वायू आणि बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक वाढले. जागतिक व्यापारयुद्धाची तीव्रता कमी होत असल्यामुळे निर्देशांक वाढत असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले
आजच्या या तेजीच्या वातावरणातही जेट एअरवेज कंपनीचा शेअर 11 टक्‍क्‍यांनी कोसळला. हिंदुजा समूह आणि इतिहाद एअरवेज या कंपनीला विकत घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे वृत्त आल्यामुळे या कंपनीचा शेअर कमी होत असल्याचे दिसून आले.

त्याचबरोबर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स या कंपनीचा शेअर मंगळवारी आठ टक्‍क्‍यांनी कोसळला. या कंपनीने 98 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याच्या अफवा बाजारात पसरल्यानंतर या कंपनीच्या शेअरची विक्री झाली. मात्र कंपनीने या वृत्ताचे तीव्र शब्दांत खंडन केले आहे. कंपनीचे लोन बुक 90 हजार कोटींचे असताना 98 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा काय केला जाऊ शकेल, असे कंपनीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)