पश्‍चिम बंगालमध्ये आता शिक्षकही रस्त्यावर

कोलकाता – पश्‍चिम बंगालमध्ये डॉक्‍टरांचे आंदोलन सुरू असताना, आता येथील शिक्षक संघटना देखील विविध मागण्यासांठी रस्त्यावर उतरल्या आहेत. शिक्षकांनी अन्य मागण्यांबरोबर वाढीव वेतनाची देखील मागणी केली आहे. त्यातच कोलकातामधील बिकाश भवन समोर आंदोलनासाठी उतरलेल्या शिक्षक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याने तेथील वातावरण तणावग्रस्त बनले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

बंगालमधील एसएसके, एमएसके आणि एएस या शिक्षक संघटनांचे शिक्षक विविध मागण्यासांठी सोमवारी शिक्षण मंत्र्यांची भेट घेण्यास निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यातच आडवल्याने परिस्थिती बिघडली यानंतर पोलिसांकडून शिक्षकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर सुरू करण्यात आला. परिणामी आक्रमक शिक्षकांनी पोलिसांनी लावलेली बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी लाठीमार केला. यामुळे वातावरण अधिकच बिघडले. डॉक्‍टर आणि शिक्षकांच्या आंदोलनाने ममता बॅनर्जी आता पुरत्या हैराण झालेल्या पहायला मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)