#CWC19 : भारतीय खेळाडू घेणार विश्रांतीचा आनंद

मॅंचेस्टर – पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविल्याबद्दल बक्षीस म्हणून भारतीय खेळाडूंना दोन दिवस विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला आहे. व्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली.

पाकिस्तानविरूध्दचा सामना महत्त्वपूर्ण होता. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतली होती. खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची परिक्षाच घेणारा हा सामना होता. त्यामुळेच या खेळाडूंना विश्रांती मिळण्याची गरज होती.

भारताचा पुढचा सामना 22 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. भारतीय संघातील शिखर धवन व भुवनेश्‍वर हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे आणखी 2-3 सामने खेळण्याची शक्‍यता नाही. सराबाचे वेळी खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठीही विश्रांती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.