‘पक्षाने संधी दिल्यास विधानसभा लढणार’

पुणे – मी पक्षाचा सक्रिय सभासद असून पक्षाकडून शिवाजी अथवा कसबा विधानसभा मतदारसंघातून संधी दिली गेल्यास आपण निश्‍चित ही निवडणूक जिंकू, असा दावा कॉंग्रेसचे शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकाद्वारे केला आहे. तसेच आपण नगरसेवक असतानाचा वॉर्ड सध्या कसबा मतदारसंघात असल्याने प्रामुख्याने आपण कसब्यातून इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नगरसेवक म्हणून आपला पूर्वीचा निवडून आलेला वॉर्ड नारायण, सदाशिव-शनिवार पेठ, मुठा नदी-किनारी परिसर शनिवार वाडा ते गांजवे चौकपर्यंत असून हा पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघात होता. त्यानंतर मतदारसंघाच्या फेररचनेत हा कसबा मतदारसंघात आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात संपर्क व पूर्वीचे कार्य चांगले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)