14 जानेवारी ते 20 जानेवारी 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

अग्नी, हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरू, शुक्र भाग्यात रवी, शनी, प्लुटो दशमात केतू, रवि बुध, लाभात नेप्च्यून तर लयेत मंगळ आहे. ग्रहमान तुम्हाला कार्यमग्न ठेवेल. नवीन कामे मिळण्यासाठी प्रयत्न कराल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. अतिधाडस व मोहापासून लांब रहावे. 

कार्यमग्न रहा 

कार्यमग्न रहा. व्यवसायात नवीन उपक्रम हाती घ्याल. खेळत्या भांडवलाची आवश्‍यकता भासेल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. नोकरीत स्वतःचे काम पूर्ण करून इतर सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. वेळेत कामे पूर्ण होतील. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. घरात विनाकारण खर्च होईल. स्वतःसाठी चार क्षण घालवाल. आप्तेष्ट, प्रियजन यांच्या
भेटीने आनंद वाटेल. तरूणांना सहवासाचे आकर्षण वाटेल. 
शुभ दिनांक : 15,16,17,18,19,20 

परदेशगमनाचे योग 

मनातील संकल्प प्रत्यक्ष कृतीत येण्यास अनुकूल वातावरण लाभेल. व्यावसायात कामाचा उत्साह वाढेल. नवीन करार-मदार, पैशाची स्थिती सुधारेल. कामा निमित्ताने परदेशगमनाचे योग येतील. नोकरीत प्रतिष्ठा वाढवणारी कामे सोपवली जातील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्व पटेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. मनाप्रमाणे कामे होतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. तरूणांचे विवाह ठरतील. 
शुभ दिनांक : 14,17,18,19,20. 

कार्यक्षेत्रात यश 

अवघड व अशक्‍य वाटणारी कामे हाती घेऊन यश मिळवाल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करा. प्रसिद्धी माध्यम व नवीन तंत्रज्ञान वापरून स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल. नोकरीत विनाकारण रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण करा. कार्य तत्पर रहा. जोडधंद्यातून विशेष लाभाची शक्‍यता. महिलांना काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. चांगली बातमी मुलांकडून कळेल. 
शुभ दिनांक : 14,15,16,19,20 

खर्च होईल 

सतत वेग-वेगळ्या कामात पुढाकार घेऊन काम करायला आवडते त्याचा उपयोग होईल. व्यवसायात सभोवतालच्या वातावरणाप्रमाणे कामाची पद्धत ठरवाल. फायद्याचे प्रमाण समाधानकारक असेल. कामाच्या निमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कामापेक्षा दिखावाच जास्त असेल. गोड बोलून खुषीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्या. कुटुंबातील व्यक्तींच्या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हाल. 
शुभ दिनांक : 14,15,16,17,18. 

कामात प्रगती 

मी माझ्या मनाचा राजा असे तत्व राहील. व्यवसायात मनाला पटेल, रुचेल तेच काम हाती घ्याल. महत्वाचे निर्णय स्वतःच घेऊन कामात प्रगती कराल. पैशाची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत स्वतःहून कुठलीही जबाबदारी पेलणार नाही, असा बाणा असेल. घरात स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न राहील त्यासाठी वेळ व पैसे खर्च झाले तरी विचार करणार नाही. मुलांच्या भविष्याबाबत मात्र सतर्क रहावे. 
शुभ दिनांक : 15,16,17,18,19,20. 

पेल्यातील वादविवाद 

पैशाचे गणित जमल्याखेरीज व खर्चाचा अंदाज आल्याशिवाय व्यवसायात पुढे पाऊल टाकू नका. उधार उसनवार शक्‍यतो टाळा. कामात काही निर्णायक बदल करावे लागतील. नोकरीत अतिविश्‍वास ठेऊ नका. हलके कान ठेऊन गैरसमज करून घेऊ नका. सूचनांचे पालन करून कामे वेळेत पूर्ण करा. घरात अट्टहासापायी चुकीचे निर्णय नकोत. रागावर नियंत्रण ठेवा. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. 
शुभ दिनांक : 14,17,18,19,20. 

मनोकामना पूर्ण होतील 

सतत नाविन्याचा शोध घेणारे तुम्ही, रुटीनचा लवकर कंटाळा येतो, त्यामुळे व्यवसायात कार्यपद्धतीत बदल घडवून नवीन योजना राबवण्याचा विचार असेल. मात्र बाजारातील चढउतारांचा अभ्यास करा. गाफील राहून चालणार नाही. नोकरीत मनोकामना पूर्ण होईल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सवलत व अधिकार देतील. महिलांनी जादाची धावपळ दगदग कमी करावी. तरूणांचे विवाह ठरतील. 
शुभ दिनांक : 15,16,19,20. 

स्वप्ने साकार 

ग्रहांची मर्जी तुमचेवर आहे, तेव्हा कामात नवचैतन्य येईल. चांगल्या मूडमुळे नवीन कामे स्वीकाराल. व्यवसायात महत्वाच्या कामात सक्रिय व्हाल. विनाकारण रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत स्वतःचे काम संपवून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. कामाचा ताण वाढेल. घरात कष्टाची तयारी असेल तर सर्व काही ठीक राहील. आनंदाच्या प्रसंगात कुटुंबातील सर्वजण सामील होतील. स्वप्ने साकार होतील. 
शुभ दिनांक : 14,17,18. 

सहकाऱ्यांना बऱ्याच अपेक्षा 

एकाच वेळी बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल त्यामुळे तुमची थोडी तारेवरची कसरत होईल. व्यवसायात वेळेचे भान ठेवणे आवश्‍यक. प्रसिद्धी माध्यम, जाहिरात, इत्यादीसाठी खर्च करावे लागतील. उलाढाल वाढवणे हे एकच ध्येय राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या तुमचेकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. रागांवर नियंत्रण ठेवा. घरात कामाचे वेळी काम करून इतर वेळ प्रियजनांच्या सहवासात घालवाल. 
शुभ दिनांक : 14,15,16,19,20. 

कामे पूर्ण करा 

कामाचे केलेले नियोजन अचानक उद्‌भवणाऱ्या कामांमुळे बिनसेल. व्यवसायात चालू कामात बदल करावे लागतील. महत्वाची कामे हाती घेऊन पूर्ण करावी लागतील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. हितचिंतक, बॅंका यांची मदत घ्याल. कामा निमित्ताने प्रवास घडेल. घरात कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. तरूणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल. 
शुभ दिनांक : 14,15,16,17,18. 

बिनसलेली घडी पूर्ववत 

कामांना वेग आणण्यासाठी विशेष प्रयत्न राहील. व्यवसायात अपेक्षित पत्र व्यवहार होतील. कार्यक्षेत्र विस्तृत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. नवीन योजना दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठ खुशामत करतील. मात्र आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत, याकडे लक्ष द्या. कंटाळवाणे काम सहकाऱ्यांचे मदतीने संपवा. घरात बिनसलेली घडी पूर्ववत होण्यास योग्य काळ, सलोख्याने व सामंजस्याने प्रश्‍न सोडवा. 
शुभ दिनांक : 14,15,16,17,18,19,20. 

तडजोड करावी 

कर्तृत्वाला यशाची झालर मिळाल्याने आनंदाला पारावार राहणार नाही. व्यवसायात केलेल्या प्रयत्नांना यश येईल. नवीन कामे मिळतील. नवीन योजना आकर्षित करतील. मात्र त्यातील त्रृटींचा अंदाज घ्या. नोकरीत वरिष्ठ नेहमीपेक्षा वेगळे काम सोपवतील, तुमच्यावर भिस्त राहील. जोड धंद्यातून विशेष कमाई होईल. बेकार व्यक्तींना नवीन कामाची सुसंधी मिळेल. लाभ घ्या. तरूणांचे विवाह जमतील. 
शुभ दिनांक : 14,15,16,17,18,19,20. 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)