अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे? म्हणत मोदींना केला सवाल
नवी दिल्ली : देशातील अर्थव्यवस्थेवरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम 22 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील टेक्सासमध्ये पार पडणार आहे. याच कार्यक्रमावरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींची फिरकी घेतली आहे. हाऊडी अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. एकमेकांना खेळकरपणे अथवा मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी अमेरिकेत हाऊडी हा शब्द वापरण्यात येतो. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील सहभागी होणार आहेत.
“Howdy” economy doin’,
Mr Modi?Ain’t too good it seems. #HowdyEconomyhttps://t.co/p2NTW3fLZo
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 18, 2019
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावरून त्यांची फिरकी घेतली आहे. हाऊडी अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे? वाटत नाही की चांगली आहे #HowdyEconomy अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित देशाचा जीडीपी ग्रोथ रेट 5 टक्क्यांवर आला आहे. तर वाहन क्षेत्रासह अन्य काही क्षेत्रांमध्येही मंदीचे वातावरण आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून विरोधी पक्षांनी आता सरकाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी सरकारनेही काही घोषणा केल्या आहेत.