उत्सुकता भविष्याची : 31 डिसेंबर ते 6 जानेवारी 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू , तुळेत शुक्र. वृश्‍चिकेत गुरू, शुक्र धनुमध्ये रवी, शनी, बुध व प्लुटो मकरेत, केतू कुंभेत नेप्च्यून तर मिनेत मंगळ आहे. पैशाचे व्यवहार करताना सजगवृत्ती ठेवा. डोके शांत ठेऊन व बोलण्यावर ताबा ठेऊन कृती करावी. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. नवी उमेद जागृत होईल.

नवीन ओळखी होतील

तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामे मार्गी लावा. नोकरीत अधिकाराचा वापर व मिळालेल्या सवलतींचा वापर योग्य ठिकाणी करा. बोलण्याने गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. घरात वादविवादाचे प्रसंग आले तरी दुर्लक्ष करा. प्रिय व्यक्ती व मित्रमंडळीच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाचे चीज होईल. तरूणांचे विवाह ठरतील.
शुभ दिनांक : 31, 1, 5, 6.


मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे

कार्यपद्धतीत बदल करून कामाचा दर्जा उंचावण्याकडे कल राहील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. नोकरीत कामाचा सपाटा वाखणण्याजोगा राहील. घरात दोन पिढीतील तफावत वैचारिक मतभेद घडवून आणेल. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांनी सजग वृत्तीने घरातील कामे करावीत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे तंत्र आत्मसात करावे, यश हमखास मिळेल.
शुभ दिनांक : 2, 3, 4.


सुवार्ता कळेल

कामाचा उरक पडल्यामुळे हायसे वाटेल. व्यवसायात नवीन कामांकडे लक्ष पुरवाल. कार्य पद्धतीत बदल करून रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. ओळखीचा उपयोग करून तुम्ही तुमचा मतलब साध्य करून घ्याल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. एखादी चांगली कामाची संधी चालून येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. विद्यार्थ्यांनी मात्र कसून अभ्यास करावा.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4


परदेशगमन, परदेश व्यवहार

पूर्वी केलेल्या कामाचा लाभ या सप्ताहात मिळेल. व्यवसायात रेंगाळलेल्या कामांना वेग येईल. सरकारी कामात गती येईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. परदेशगमन, परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. घरात आप्तेष्टांचे रुसवे-फुगवे सहन करावे लागतील. डोके शांत ठेवा. प्रकृतीचे तंत्र सांभाळून कामे करा. विद्यार्थ्यांना उत्तम ग्रहमान लाभेल. त्याचा लाभ घ्यावा.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4.


परिस्थितीनुरूप बदल

कामाच्या पद्धतीत सहसा बदल केलेला तुम्हाला आवडत नाही. परंतु सभोवतालच्या परिस्थितीनुरूप कामात बदल करावा लागेल. व्यवसायात चौफेर नजर ठेऊन स्पर्धेत राहण्याकडे कल राहील. पैशाची उलाढाल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. अतिविश्‍वास टाळा. प्रकृतीकडे वेळीच लक्ष द्या.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4, 5, 6.


कामांना वेग

तुमच्या सुप्त गुणांना वाव देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धी माध्यामांचा वापर करून उलाढाल वाढवाल. सरकारी कामांना गती येईल. परदेशागमन व परदेश व्यवहाराच्या कामांना वेग येईल. नोकरीत खुबीने कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. महिलांनी लवचिक धोरण ठेऊन मतलब साध्य करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात चालढकल करू नये.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4, 5, 6.

वैचारिक तफावत

कामाचे नियोजन योग्य केलेत तर तणाव जाणवणार नाही व आनंदही घेऊ शकाल. व्यवसायात कामाचे प्रमाण भरपूर असेल त्यामुळे समाधान वाटेल. मात्र कामाची पूर्तता वेळेत करणे बंधनकारक राहील. नोकरीत ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट कराल. घरात वैचारिक तफावत जाणवेल. मोठ्यांच्या संमतीशिवाय कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांनी नवीन प्रयोग टाळावेत.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4, 5, 6.


यशस्वी व्हाल

तारेवरची कसरत करावी लागेल, तरीही त्यात यशस्वी व्हाल. विश्‍वासार्हता पडताळून नवीन कामाची जबाबदारी सहकाऱ्यांवर सोपवा. जादा कमाईच्या मोहाने न पेलणारी कामे स्वीकारू नका. त्यासाठी वरिष्ठ आवश्‍यक त्या सुविधा देतील. कामा निमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात प्रत्येकजण आपलेच खरे करण्याचा प्रयत्न करील. तरी डोके शांत ठेवा. विद्यार्थ्यांनी शंकेचे निरसन वेळीच करावे.
शुभ दिनांक : 2, 3, 4, 5, 6.


इप्सित साध्य कराल

कृतीशीलता वाढल्याने उत्साही रहाल. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात कुठल्याही मार्गाचा अवलंब करून इप्सित साध्य करून घ्याल. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्व कळेल. घरात व्यक्तींना दिलेले आश्‍वासन पाळावे लागेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात टंगळमंगळ करू नये. महिलांनी खरेदीचा मोह टाळावा.
शुभ दिनांक : 31, 1, 5, 6.


भांडवलाची गरज भासेल

प्रगतीला पूरक ग्रहमान लाभले आहे. पूर्वी काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील. व्यवसायात काही ठोस पावले उचलून त्याप्रमाणे कृती कराल. जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत कार्य पध्दतीत बदल करून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील. घरात वातावरण चांगले राहील कुटुंबासमवेत प्रवासाला जाण्याचा योग येईल. विद्यार्थ्यांना यश हमखास मिळेल.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4.


ठोस उपाय योजा

योग्य दिशा सापडेल त्यामुळे कामांना गती येईल. व्यवसायात कामाचा वेग वाढवण्यासाठी काही ठोस उपाय योजाल. ओळखीचा उपयोग याकामी होईल. नोकरीत विचार व कृती यांची सांगड घालून कामाचे नियोजन करा. नवीन नोकरीचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. आळस झटकून आजचे काम आजच करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन शांत ठेवावे.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4, 5, 6.


कामाचा ताण वाढेल

चंचल मनाला आवर घालून व कामाचे नियोजन करून कार्य पद्धत ठरवावी लागेल. कोणावरही विसंबून न रहाता स्वतः कंबर कसून काम करावे लागेल. व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी करा. त्यामुळे कामाचा ताण वाढेल. घरात कामात इतर व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरूणांना नवीन संधी खुणावतील. महिलांना छंद जोपासता येईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल.
शुभ दिनांक : 2, 3, 4, 5, 6. . 


 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)