गायत्री सुरेशही ठरली होती मीटू ची शिकार 

बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेंतर्गत अनेक बड्या व्यक्तींवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला असून आता हे वादळ मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीमध्येही पोहोचले आहे. मल्याळम अभिनेत्री गायत्री सुरेशने मीटू मोहिमेंतर्गत एका प्रोड्युसरविषयी खुलासा करत त्याच्यावर या प्रकरणी आरोप केले आहेत.
एका रेडिओ चॅनेलवर बातचीत करताना गायत्रीने आपल्यावरील आपबिती मांडली आहे, तिने यावेळी सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला चित्रपटात काम देण्यासाठी प्रोड्युसर्सने वाईट डिमांड केली होती.

ती म्हणाली की तो प्रोड्युसर मला असे मॅसेज पाठवून विचारायचा की, तुम्ही तयार आहात का? मी याचे कधी उत्तर दिलेले नाही. मी संबंधीत प्रोड्युसरशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे कामाविषयी पुढे कोणतीही चर्चा होत नव्हती. गायत्रीच्या आधी मल्याळम अभिनेत्री पार्वतीनेदेखील या गोष्टीचा खुलासा केला आहे की, करिअरच्या सुरुवातीला असे तमाम ऑफर्स मिळाले होते. परंतु, तिने नकार दिला. ते काम देण्याच्या बदल्यात कॉम्प्रोमाईज करण्यासाठी सांगितले जात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, बॉलीवूडमध्ये अलोक नाथ, साजिद खान, नाना पाटेकर, राजकुमार हिरानीसह अनेक जणांवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. ज्यात नाना पाटेकर यांच्युआवरील आरोप प्रकरणी पोलिसांमध्ये एफआयआर देखील दाखल केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)