स्वप्नातले टेरेस…

महत्त्वाचे म्हणजे घर घेताना जर आधीच ठरवले, की आपल्याला टेरेस कुठे असलेले आवडेल तर बर! आता बिल्डर सर्वांनाच हॉलला टेरेस देऊ शकत नाही. कारण त्यालाही वास्तूविशारदाने घातलेल्या मर्यादा असतात; पण आपल्याला त्याने पर्याय दिलेले असतात. जसे हॉल, बेडरूम, डायनिंग किंवा किचनला अटॅच टेरेस. मग आपण ठरवायचे की आपल्याला कोणते सोईस्कर आहे; पण इतक्‍या हौसेने घेतलेले टेरेस लोक अक्षरशः कसेही ठेवतात. त्यांच्या टेरेसमध्ये वाळत घातलेले कपडे उडत, लोंबकळत खालच्यांच्या टेरेसपर्यंत आलेले दिसतात. काहीजण टेरेसचा कबाडखाना करतात. जुन्या तुटक्‍या वस्तू एकावर एक रचून ठेवलेल्या दिसतात, तर काही जणांकडे टेरेस वृक्षवल्लींनी भरभरून गेलेले दिसते.

ड्राय टेरेस : आता टेरेस कसे सजवावे याआधी ड्राय बाल्कनी ही संकल्पना समजावून घेऊ. नवीन ट्रेंडप्रमाणे घरात शक्‍यतो किचन किंवा डायनिंगला अटॅच एक बाल्कनी/टेरेस जे आकारान लहान असते असे दिले जाते.

जिथे भांडी घासण्याची मोरी तसेच वॉशिंग मशिनसाठी सोय केलेली असते. याला कधी कधी युटिलिटी एरिया असेही म्हणतात आणि तो नावाप्रमाणे फार उपयोगी पडतो आणि बिल्डिंग्जच्या दर्शनी भागात हा एरिया येत नसल्याने या ठिकाणी आपण कपडेही वाळत घालू शकतो.

टेरेस कसे सजवावे?
हॉल अटॅच : जर आपल्या घरात पाहुण्यांची ये-जा जास्त असेल आणि हॉल अटॅच टेरेसने हॉल दिसत असेल तर हॉल अटॅच्ड टेरेस घ्यावे. आता ते सजविताना जर युटिलिटी एरिया वेगळा दिला असेल तर त्यात एक झोपाळा किंवा केनचा सिंगल सीटर झोका लावावा, तर टेरेसवर ऊन येत असेल तर काही प्रमाणात कुंड्या लावाव्यात. (पण खूप गर्दी करू नये) त्याला वूडन फ्लोअरिंग इफेक्‍ट असलेले फ्लोअरिंग करून घेतले तर जास्त उठावदार दिसते. एक भिंत टेरेसची अशी निवडावी. जिथे पाऊस लागत नाही, तिथे एखादे म्युरल किंवा वारली पेंटिंग करून घ्यावे. हे फारच छान दिसते.

– अटॅच बेडरूम जर टेरेस असेल तर एखादी आराम खुर्ची ठेवावी. वासांच्या फुलांची झाडे लावावी, एखादा छोटासा धबधबा कोपऱ्यात ठेवावा. असे धबधबे मार्केटमध्ये सहज मिळतात.
– जर डायनिंग अटॅच टेरेस असेल तर त्याच्या फ्लोअरिंगवर कृत्रिम लॉन टाकून घ्यावे. ज्यामुळे टेरेस विथ गार्डन असल्यासारखे वाटते. त्यावर एक टू सिटर टी टेबल ठेवावा.
– जर घरात युटिलिटी एरिया वेगळा नसेल आणि डायनिंग आणि किचनला अटॅच टेरेस असेल तर आपण त्या टेरेसचे दोन भाग करून घ्यायचे. एक युटिलिटी एरिया व एक टेरेस. आपण मधे पार्टिशन करू शकतो व कपडे वाळत घालण्यासाठी घरातलाच एक व्हरंडा असा निवडावा जिथे हवा खेळती राहील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)