‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशल शूटिंग दरम्यान गंभीर जखमी

मुंबई – बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल याचा चित्रपट शूटिंग दरम्यान अपघात झालेला आहे. चित्रपटातील साहसी दृश्यांच चित्रीकरण करताना हा अपघात झाला असून, यामध्ये विकी कौशलला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

आगामी चित्रपटाचे शूटिंग करताना दरवाजा विकी कौशलच्या चेहऱ्यावर लागून, गालाच्या हाडाला गंभीर दुखापत झाली आहे. भानू प्रताप सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटाच्या शूटिंग साठी विकी कौशल गुजरात मध्ये होता. त्यावेळी ही घटना घडली. यानंतर विकी कौशलला हॉस्पिटल मध्ये लगेच दाखल करण्यात आले. यावेळी विकीच्या चेहऱ्यावर १३ टाके घालावे लागले आहेत.

यापूर्वी अभिनेता विकी कौशलने ‘उरी’ या सिनेमामध्ये काम केले होते. तर ‘उधम सिंग’ , ‘तख्त’ या आगामी चित्रपटात विकी कौशल झळकणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.