‘दबंग 3’मध्ये ‘प्रमोद खन्ना’ बनणार सलमान खानचे बाबा!

सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाचे शूटींग नुकतेच संपले आहे. ‘भारत’ चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. यात सलमान खानच्या विविधांगी रूपे पाहायला मिळाली. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातच सलमानने भारत चित्रपटाची शूटिंग नुकतीच संपविली आहे. यानंतर तो आगामी चित्रपट ‘दबंग3’ च्या शूटिंगमध्ये बिझी झाले आहे,    गेल्या अनेक दिवसांपासून ‘दबंग3’ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

Introducing Pramod Khanna . . #Dabangg3 @aslisona @prabhudheva

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on


सलमान खानच्या दबंग 3 चे शूटिंग 1 एप्रिलपासून सुरु झाले असून डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. तर कन्नड स्टार किच्चा सुदीप हा ‘दबंग 3’मध्ये व्हिलेनच्या भूमिकेत दिसेल.‘दबंग’ आणि  ‘दबंग 2’मध्ये अभिनेते विनोद खन्ना यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मात्र आज विनोद खन्ना आपल्यात नाहीत. त्यामुळे ‘दबंग 3’मध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. याबाबत सलमानने इंस्टाग्रामवर खुलासा केला आहे. ‘दबंग 3’ मध्ये सलमानच्या वडिलांची म्हणजेच प्रजापति पांडे यांची भूमिका  प्रमोद खन्ना साकारणार आहेत. विनोद खन्ना आणि प्रमोद खन्ना जवळपास सारखेच दिसतात. त्यामुळे प्रमोद खन्ना यांची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

Chulbul is back….. #Dabangg3 @aslisona @arbaazkhanofficial @nikhildwivedi25 @prabhudheva @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

प्रभूदेवा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. तर मलायका आणि अरबाज खानचा मुलगा अरहान प्रभूदेवाला असिस्ट करणार आहे. अरहान ‘दबंग3’ मधून सहायक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)