पुणे – पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित व कोहिनूर ग्रुप प्रायोजित 14 वर्षांखालील आंतरशालेय कोहिनूर करंडक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या लढतीत एसएसपीएम, सिम्बायोसिस व सरदार होशंग संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला आहे.
पहिल्या सामन्यात एसएसपीएम डे स्कूल संघाने विखे पाटील मेमोरियल स्कूलवर 52 धावांनी विजय मिळवला. एसएसपीएम डे स्कूल संघाने 20 षटकांत सर्वबाद 152 धावा केल्या. त्यामध्ये स्वयम यादवच्या 35 तर विवेक गायकवाडच्या 23 धावा होत्या. आयुष कानडेने 24 धावांत 2 विकेट्स घेतल्या. विखे पाटील स्कूलचा डाव 19 षटकांत 100 धावांत संपुष्टात आला. त्यात ओंकार खांदवेच्या 22 धावा सर्वोच्च ठरल्या. आर्यशूर सोनवणेने 26 धावांत 4 विकेट्स घेतल्या.
सिम्बायोसिस स्कूलने डीईएस सेकंडरी स्कूलवर 7 विकेट्सने मात केली. डीईएस सेकंडरी स्कूलने 20 षटकांत 71 धावा केल्या. त्यात तनिष पवारच्या 22 धावा सर्वाधिक ठरल्या. वेद कुलकर्णीने 7 धावांत 4 तर रुछिर देशपांडेने 15 धावांत 3 विकेट्स घेतल्या. सिम्बायोसिस स्कूलने त्यात रोहित कांबळेच्या 38 धावा सर्वोच्च होत्या. तर अर्यन दीक्षितने 11 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
तिसऱ्या सामन्यात सरदार दस्तुर होशांग संघाने बीव्हीबी परांजपे स्कूलवर 7 विकेट्सनी मात केली. परांजपे स्कूलने 6 बाद 102 धावा केल्या. त्यात हर्ष भोईटेच्या 36 धावा
सर्वोच्च ठरल्या. वेदान्त देडगेने 17 धावांत 3 विकेट्स घेतल्या. सरदार दस्तुर होशांग स्कूलने 17.2 षटकांत 3 बाद 105 धावा करून हा सामना जिंकला. त्यात इसा महादारच्या 37 तर सार्थ गायकवाडच्या 28 धावा होत्या. रुद्र औरंगाबादकरने 16 धावांत 1 विकेट घेतली.