अमेरिकेत आता ग्रीन कार्डऐवजी बिल्ड अमेरिका व्हिसा पद्धत

ट्रम्प यांची नवीन घोषणा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे इमिग्रेशन धोरण जाहींर केले आहे. अमेरिकेत गेली अनेक वर्ष विदेशी नागरीकांच्या अमेरिकेतील कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड दिले जात होते पण आता ती पद्धत बंद करण्यात येणार असून त्याऐवजी आता बिल्ड अमेरिका व्हिसा पद्धत त्यांनी लागू करण्याचे ठरवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी म्हटले आहे की जगातील कोणत्याही माणसाला अमेरिकेत येण्यास बंदी नसेल. तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे. मात्र आता केवळ लॉटरीपदधतीने नव्हे किंवा तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात म्हणून नव्हे तर तुमच्यातील उच्च दर्जाचे कौशल्य आणि तुमच्या गुणवत्तेच्या आधारावरच तुम्हाला आता अमेरिकेचे कायम वास्तव्याचे व्हिसा जारी केले जातील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बाहेरील नागरीकांच्या अमेरिकेतील वास्तव्याचा तेथील नागरीकांवर बोजा पडू नये म्हणून तुम्ही आर्थिक सक्षम आहात की नाही याचीही पहाणी करून हा व्हिसा जारी केला जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतर्फे आत्ता पर्यंत दरवर्षी सुमारे दहा लाख लोकांना ग्रीन कार्ड दिली जात होती. ग्रीन कार्ड म्हणजे कायम वास्तव्याचाच परवाना असे. त्या आधारे संबंधीताला पाच वर्षाच्या अवधीनंतर अमेरिकेचे नागरीकत्वही मिळत असे. आमच्या नवीन इमिग्रेशन धोरणात आम्ही कोणालाही मज्जाव करणार नाही. उद्याच्या अमेरिकेच्या भवितव्यासाठीही तुम्हाला येथे येण्याची अनुमती दिली जाईल. पण हे करताना आम्हाला आमचा देशही घडवायचा आहे. येथील नागरीकांच्या हिताचीही काळजी घ्यायची आहे त्याचाही विचार करून हे नवीन व्हिसा धोरण अंमलात येत असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)