#Budget2019 : राष्ट्रीय बॅंकाना 70 हजार कोटी रूपये देणार

नवी दिल्ली – देशातील राष्ट्रीयकृत बॅंकांची कर्ज देण्याची क्षमता वाढावी आणि त्या अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने या बॅंकांमध्ये 70 हजार कोटी रूपयांचा निधी गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. या बॅंकांचे कर्ज वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून गेल्या वर्षभरात बॅंकांनी 1 लाख रूपयांचे बुडित कर्ज वसुल केले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

गेल्या चार वर्षात ईनसॉल्वन्सी आणि बॅंकरप्सी कोड तसेच अन्य उपाययोजनांमुळे बॅंकांनी चार लाख कोटी रूपयांची रक्‍कम वसुल केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका मजबूत करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असून आता या क्षेत्रातील बॅंकांची संख्या 8 वर आणण्यात आली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here