वाई-मांढरदेवी रस्त्यावरील पुलाला भगदाड

बांधकाम विभागाकडून पूल वाहतुकीसाठी बंद

वाई – वाई-मांढरदेवीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एमआयडीसी जवळ असणाऱ्या पाटबंधारे खात्याच्या कालव्यावरील पुलाचे खांब निखळले असून पूल कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धोकादायक झालेला हा पुल तहसिदारांच्या आदेशानंतर बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान, सर्व वाहतूक रविवार पेठेतून परखंदी रस्त्याने एमआयडीसीकडे वळविण्यात आली आहे.

कालव्यावर असणाऱ्या या पुलाचा बीम ढासळला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा पूल ढासळू शकतो. मांढरदेवसह परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अचानक कालव्यावरील पूल कोसळून अपघात घडल्यास मोठी जीवित होवू शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून हा पुल तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाई तहसीलदार रणजित भोसले यांनी पाटबंधारे खाते व बांधकाम विभागाचे अधिकारी यांना बरोबर घेवून ढासळलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच पाटबंधारे खात्याला पूल त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाटबंधारे खात्याने कालव्यावरील पूल नव्याने बांधकाम करण्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी निविदा पाठविण्यात आल्या आहेत, असे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले, धोम पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या दोन्ही कालव्यावरील असंख्य पुलाचे बीम ढासळले असून पुलांचा भराव पूर्णपणे खचलेला आहे. उजव्या-डाव्या कालव्यावरील असंख्य पुलांच्या अवस्थेची पहाणी प्रांत, तहसीलदार यांनी करावी व याही पुलांची उभारणी करण्याचे आदेश तहसीलदारांनी पाटबंधारे खात्याला द्यावेत व त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)