कर्नाटकात भाजप नेत्यांचे आंदोलन सुरूच राहणार

संग्रहित छायाचित्र....

बंगळुरू – कर्नाटक सरकारने जिंदाल समूहाला कमी दरात जमीन विक्री केल्याप्रकरणी भाजपाने बंगळुरूमध्ये पुकारलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह भाजपाचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. रात्रभर हे नेते आंदोलनस्थळी होते. हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

बंगळुरूत जिंदाल समूहाला 3 हजार 667 एकर जमीन देण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभर भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केल्यानंतरही या नेत्यांनी आंदोलनस्थळी रात्रभर झोप घेऊन दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे. जिंदाल स्टीलला एक लाख रुपये प्रति एकरच्या दराने जमीन देण्यात आली आहे. मात्र, ही किंमत खूपच कमी आहे, असा आरोप येडियुरप्पा यांनी केला आणि आंदोलन सुरू केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)