पराभवाची चाहुल लागली म्हणूनच “ईव्हीएम’बाबत शंका – अमित शहा

अमित शहा यांच्याकडून विरोधकांचा समाचार

नवी दिल्ली – विरोधकांना पराभवाची चाहुल लगल्यामुळेच “ईव्हीएम’बाबत शंक घेतल्या जात आहेत. विरोधकांकडून “ईव्हीएम’वर शंका उपस्थित करून जनादेशाचा अवमान केला जात आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. मतदानाची सहाव्या टप्प्यानंतरच विरोधकांकडून “ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित केली जायला लागली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’ ला निवडणूकीत निर्विवाद बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवणाऱ्या “एक्‍झिट पोल’नंतर ही शंका अधिकच तीव्र झाली.

मात्र केवळ “एक्‍झिट पोल’च्या निष्कर्शांच्या आधारे “ईव्हीएम’वर अविश्‍वास कसा काय दाखवला जाऊ शकतो, असा सवालही अमित शहा यांनी उपस्थित केला. 22 विरोधी पक्षांनी निवडणुक आयोगाकडे मतमोजणीचा क्रम बदलण्यची आणि “व्हीव्हीपॅट’च्या 5 पावत्यांची पडताळणी आगोदर करण्याची मागणी बेकायदेशीर असल्याची टीकाही त्यांनी केली. यासंदर्भातील कोणताही निर्णय सर्वपक्षीय बैठकीमध्ये पूर्ण सहमतीनंतरच घेतला जाऊ शकेल, असे शहा म्हणाले.

निकालानंतर रक्‍तपात होण्याची शक्‍यता उपेंद्र कुशवाह यांनी वर्तवली होती. त्या वक्‍तव्यावर टीका करताना अशा प्रकारच्या वक्‍तव्याला लोकशाहीमध्ये काहीही स्थान नसल्याचे शहा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)