अपहरण करून खून करणाऱ्या पाथर्डीतील दोघांना अटक

नगर – शेतीच्या वादातून अपहरण करून हत्या करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पाथर्डीतील आडगाव येथील या हत्येचा गुंता पोलिसांनी सोडविला आहे. चंद्रकांत आनंदा बर्फे (वय 52) व त्याचा मुलगा अमोल (वय 20, दोघे रा. आडगाव, पाथर्डी) या दोघांना अटक केली आहे.

राजू रभाजी शेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. तक्रार राजू यांचे बंधू अशोक यांची यात हत्या झाली आहे. शेंडे आणि बर्फे यांची शेतीवरून सतत वाद होत होते. अशोक शेंडे यांचे या वादातून चंद्रकांत बर्फे, अमोल बर्फे, सुरेश बर्फे व शिवाजी बर्फे या चौघांनी त्यांचे 11 ऑक्‍टोबरला अपहरण केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यानंतर अशोक शेंडे यांचा मृतदेह धारवाडी-लोहसर रोडवर सापडला होता. चेहरा ओळखू येऊ नये म्हणून तो विद्रूप करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास करत चंद्रकांत बर्फे व त्याचा मुलगा अमोल याला पिंपरी (ता. पुणे) येथून अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)