ग्रामपंचायत सदस्याच्या पुत्राचा विवाहितेवर अत्याचार

जामखेड – तालुक्‍यातील दिघोळ ग्रामपंचायत सदस्य पुत्राने एका मूकबधिर विवाहितेवर अत्याचार केला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत सदस्य पुत्र आरोपी कृष्णा बाळू राजगुरू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला शनिवारी (दि.17) आपल्या घराशेजारी असलेल्या पडक्‍या जागेत लघुशंकेसाठी गेली होती. यावेळी आरोपी कृष्णा बाळू राजगुरू तेथे आला. तसेच या महिलेवर अत्याचार केला. रात्री पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजगुरू विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी राजगुरू फरार असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत. एप्रिल महिन्यातही सदर आरोपीने विद्यालयात जाऊन मुलींच्या वर्गात गोंधळ घातला होता. त्यावेळी देखील त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.