बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमीर खानची मुलगी इरा हिने आपण डेटिंग करत असल्याची जाहीर कबुली दिली आहे. गेले अनेक दिवस तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिसणारा मिशाल कृपलानी तिचा बॉयफ्रेण्ड आहे. “आस्क मी एनिथिंग’ला उत्तर देताना इराने मिशालला डेट करत असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. सोशल मीडियावरील फोटोंमुळे इरा अनेकदा चर्चेत आलेली आहे. इराने काही महिन्यांपूर्वी मिशालसोबत फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. चाहत्यांनी संबोधलेला “मिस्ट्री मॅन’ इराचा बॉयफ्रेण्ड आहे का, असा प्रश्न अनेक जणांनी कमेंटच्या स्वरुपात विचारला होता.
त्यावेळी इराने इन्स्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केले होते. कॅलिफोर्नियातील सांता बार्बरामधले हे फोटो होते. ःतुमची सुट्टी मिशालसारखीच हसरी गेली असेल, अशी आशा.’ असे कॅप्शन देताना तिने तीन बदामही जोडले होते. दुसऱ्या फोटोत तर मिशाल इराच्या कपाळावर किस करताना दिसला होता. दरम्यान, मिशाल एक नवोदित कलाकार आहे. तो संगीतकार म्हणून नावारुपास येत आहे. मिशालने आपल्या काही कलाकृती इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत.