दादरमधील पोलीस वसाहतीत आग; एका मुलीचा मृत्यू

मुंबई – दादर येथील पश्‍चिमेला असलेल्या पोलीस वसाहतीमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी अशोक चव्हाण (वय 16 वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच क्रमांकाच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी श्रावणी ही घरात झोपलेली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने अथक मेहनत घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर जखमी झालेल्या श्रावणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. या आगीची झळ शेजारच्या काही घरांनाही बसली.

दरम्यान, ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तिचे आई-वडील एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. श्रावणीच्या घराला बाहेरून कुलूपदेखील लावण्यात आलेले होते. त्यामुळे ही केवळ दुर्घटना होती की श्रावणीने आत्महत्या केली? याबाबतची अधिकृत माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)