प्रियांका चोप्रा – जोनासचे इन्स्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. स्वतः प्रियांकाने याबाबतची माहिती आपल्या फॅनबरोबर शेअर केली आहे. तिला झालेला आनंदच तिने आपल्या फॅनबरोबर शेअर केला आहे, असे म्हटले तर ते अधिक योग्य होईल. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या फॅन्सना एक मस्तपैकी “फ्लाईंग कीस’ देऊन सर्वांना धन्यवाद दिले आहेत. या व्हिडीओबरोबर तिने एक मेसेजही दिला आहे. “बिग शूट आऊट टू माय इन्स्टाफॅम’असे तिने म्हटले आहे.
अलीकडेच जेव्हा ती मेट गाला इन्व्हेंटमध्ये गेली होती, तेव्हा तिच्या तिथल्या लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा तिथला अवतार इन्स्टाग्रामवरच सर्वात जास्त व्हायरल झाला होता. प्रियांका चोप्राच्या या गाऊनची किंमत ही तब्बल 45 लाख रुपये एवढी असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच प्रियांकाने जे डायमंड इयरिंग घातले आहेत त्याची किंमतही जवळजवळ 10 लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, प्रियांकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘आफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. मेट गालाच्या यंदाच्या थीमनुसार प्रियांकाचा हा लूक एकदम परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही. पण या इन्स्टाग्राम पोस्टच्या मध्यमातूनच तिला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. यासाठीच प्रियांकाने आपल्या फॅन्सना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
https://www.instagram.com/p/BxdEKMUn8gG/?utm_source=ig_web_copy_link
“बाजीराव मस्तानी’मध्ये प्रियांका आणि दीपिका दोघी एकत्र होत्या. दीपिकाचे इन्स्टाग्रामवरच्या फॅनची संख्या 3.5 कोटी इतकी आहे. पण निक जोनासबरोबर लग्न झाल्यावर प्रियांकाची प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय पातळीवर झपाट्याने वाढत गेली आणि वर्षभराच्या आतच तिने दीपिकाला मागेही टाकले. तिच्या व्यतिरिक्त आलिया भट पण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिचे देखील इन्स्टाग्रामवर 3 कोटींच्या आसपास फॅन फॉलोअर्स आहेत.