राहुल यांच्या सभांना अनुपस्थिती हा रणनीतीचा भाग -तेजस्वी यादव

महाआघाडीत मतभेद असल्याचा इन्कार

पाटणा  -कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बिहारमध्ये आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये राजदचे नेते तेजस्वी यादव दिसलेले नाहीत. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, त्या सभांमधील माझी अनुपस्थिती हा रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्टीकरण राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र असणाऱ्या तेजस्वी यांनी दिले आहे.

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेस आणि राजदने काही लहान पक्षांशी हातमिळवणी करत महाआघाडी स्थापन केली आहे. महाआघाडीच्या प्रचारासाठी राहुल यांच्या आतापर्यंत बिहारमध्ये चार सभा झाल्या. पण, त्या सभांमध्ये राहुल आणि तेजस्वी एका व्यासपीठावर आले नाहीत. त्यामुळे महाआघाडीत मतभेद असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

मात्र, त्या चर्चा तेजस्वी यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सोमवारी फेटाळून लावल्या. प्रचारात अधिकाधिक ठिकाणांपर्यंत पोहोचण्याची आमची रणनीती आहे. त्यामुळे राहुल आणि मी एकत्र दिसलो नाही. अर्थात, आगामी काळात आम्ही एकत्र येऊ, असे त्यांनी सांगितले. ऐक्‍याचे दर्शन घडवण्यासाठी पत्रकार परिषदेला कॉंग्रेससह महाआघाडीच्या सर्वच घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, महाआघाडीची प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या एनडीएचे नितीश कुमार, रामविलास पासवान आणि सुशीलकुमार मोदी हे नेते एकत्रित सभा घेत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर तेजस्वी यांनी त्या नेत्यांची खिल्ली उडवली. ते नेते एकट्याच्या बळावर 1 हजार लोकांची गर्दीही खेचू शकत नाहीत. त्यामुळे एकत्र येणे ही त्यांची अपरिहार्यता आहे, असे उत्तर तेजस्वी यांनी दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)