पाकनेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत -मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर- भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्‌विटरवरून म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बाडमेरमध्ये ‘पाकिस्तान वारंवार भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांची धमकी देत आला आहे. मात्र, आता भारत त्यांच्या धमक्‍यांना घाबरत नाही. आमच्याकडेही अण्वस्त्रे असून, ती आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत.’ असे म्हटले होते. त्यावर मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत.’ अशा शब्दांमध्ये टीका केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.