मुंबई : राज्यात सध्या गुलाबी थंडीने एंट्री केल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे, सातारा, नाशिकसह अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. महाबळेश्वरात तापमान 10.4 अंशांवर पोहोचले आहे. तर वेण्णालेक 6 अंशांवर घसरले आहे. तिकडे धुळ्यातही तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. धुळ्यात तापमान 8.2 अंशांवर पोहोचलंय. नाशिकमध्येही हुडहुडी भरलेय. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागली आहे.
महाबळेश्वरातील तापमान घसरले आहे. महाबळेश्वरातील तापमामन तब्बल 11 अंशावर तर वेण्णालेक परिसरातील तापमान 6 अंशावर गेले आहे. तर सातारा शहरातीलही तापमान 15 अंशावर गेले आहे. अनेक दिवस रेंगाळलेल्या पावसानंतर नशिकमध्ये थंडीचे आगमन झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरतोय नाशिकचे तपामन तीन दिवसांत 13 अंश सेल्सिअसवरून 10.4 अंशापर्यंत खाली घसरले आहे. तर निफाडमध्ये 8.1 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल नऊ अंशावर असलेले तापमान आज आठ पूर्णांक दोन अंशावर येऊन पोहोचल्याने वातावरणातील गारठा चांगलाच वाढला आहे. राज्याच्य बहुतांश भागाला थंडीनं हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुकं पडलेले बघायला मिळत आहे. ठिकठिकाणी पहाटे आणि भल्या सकाळी लोक शेकटोची ऊब घेताना दिसत आहेत.