राजगुरूनगर अंगणवाडीस दीड लाखांचा निधी

  • शरद बुट्टे पाटील : पावसामुळे छप्पर होते गळाले

राजगुरुनगर  – राजगुरूनगर नगरपरिषदेजवळच्या अंगणवाडीच्या दुरुतीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1 लाख 40 हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली. दि. 23 जूनच्या मध्यरात्री झालेल्या पावसामुळे या अंगणवाडीचे छप्पर गळून अंगणवाडीत फुटभर पाणी साचले होते. याबाबत दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होती त्याची जिल्हा परिषदेने दखल घेत दीड लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र, हा निधी अपुरा पडत असल्याने राजगुरुनगर रोटरी क्‍लबच्या माध्यामतून उर्वरित दुरुस्तीचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती रोटरीचे माजी अध्यक्ष अविनाश कोहिनकर यांनी सांगितले.
अंगणवाडीला चांगली इमारत मिळावी अशी मागणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व राजगुरूनगर नगर परिषदेकडे अनेक दिवसांपासून केली मात्र या कडे लक्ष दिले जात नाही. अंगणवाडीचे पत्रे फुटल्यानेल्पावसात अंगणवाडीत फुटभर पाणी साचते. पोषण आहार व शालेय साहित्य साहित्य भिजते. विद्यार्थ्यांना बसता व खेळता येत नाही. याबाबत दैनिक प्रभात ने आवाज उठवला होता. याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, अतुल देशमुख यांनी जिल्हा परिषदेत येथील अंगणवाडीच्या इमारतीकडे लक्ष वेधण्याचे व ती दुरुस्त करण्यासाठी निधी मिळण्याची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा परिषदेने दीड लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या इमारतीच्या दुरुस्तीसाठी पावणेतीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.दरम्यान, या इमारतीची जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. टी. दुधाळकर, नामदेव बांगर, रोटरी क्‍लबचे माजी अध्यक्ष अविनाश कोहिनकर,अविनाश कहाणे, गणेश घुमटकर, विद्यमान अध्यक्ष नरेश हेडा, काळूराम पिंजण, शिवाजी डावरे, नगरसेवक शंकर राक्षे, मनोहर सांडभोर,अंगणवाडी सेविका दिपाली खेडकर यांच्यासह पालक नागरिक उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)