मोदींच्या मार्गदर्शनाखाली हा विजय मिळाला- अमित शहा

नवी दिल्ली – सध्या देशभरामध्ये भाजपची ऐतिहासिक वाटचाल असून, भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या निमित्ताने दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करण्याकरिता पंतप्रधान नरेद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सभेचे आयोजन केले होते.

दरम्यान, आजचा हा विजय ऐतिहासिक असून, हा विजय भारताच्या जनतेचा आहे. प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. तब्बल ५० वर्षांनंतर एखाद्या नेत्याने दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले आहे, असे शाह म्हणाले. मोदींच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने हा विजय मिळवला असून, मोदी सरकारच्या धोरणांना जनतेने आशीर्वाद दिला आहे. असे देखील शहा यावेळी म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/1131567374308499463

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)