टोईग बॉयची वाहनचालकांवर दादागिरी

वडगावशेरी – रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किग करणाऱ्या गाड्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते.ही कारवाई वाहतूक पोलिस व टोईग बॉय यांच्याकडून केली जाते.ही कारवाई करताना टोईग बॉय नागरिकांवर अरेरावी करतात त्यातून वादविवाद होतात.असे प्रकार विमाननगर भागात रोज पाहायला मिळत आहे.या टोईग बॉयची दादागिरी संपावा अशी मागणी आता वाहन चालकांकडून होत आहे.

शहराबरोबर उपनगरात सुद्धा वाहतूकीची समस्या मोठी अवघड बनली आहे. त्यात नगररोड वर तर मॉल्स आणि पंचतारिक हॉटेल्स यांची संख्या अधिक आहे.याठिकाणी येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिकृत पार्किग सुद्धा अपुरी पडत आहेत.त्यामुळे अनेक जण रस्त्यावर वाहने पार्क करतात.ही वाहने नो-पार्किग मध्ये उभी केली जात असल्यामुळे वाहतूक विभाग या वाहनांवर कारवाई करते.कारवाई करताना अनेक वेळा वाहने टेम्पो मध्ये उचलून टाकली जातात.ही वाहने उचलणारे टोईगं बॉय कशाही पद्धतीने वाहने उचलतात.त्यामुळे वाहनाचा काही भाग तुटण्याची शक्‍यता अधिक असते.गेल्या महिन्यात तर टोईंग बॉय बरोबर वाहन चालकाचे इतके भांडण झाले की शेवटी चिडून या टोईग बॉयनी वाहनासकट उचलून चालकाला टेम्पो मध्ये बसविले.या प्रकारानंतर नागरिकांनी त्यांच्याबद्धल वाहतूक विभागाकडे तक्रार केल्यानंतर टोईग बॉय थोडे शांत झाले होते पण आता पुन्हा त्यांची अरेरावी सुरु झाली होती.

त्यांची भाषा सुद्धा अर्वाच्य असते.त्यामुळे अनेक वेळा वाहन चालक त्यांच्याशी बोलायला घाबरतात. याबाबत येथील काही नागरिकांनी एकत्रित येऊन टोईग बॉय बाबत तक्रार वाहतूक पोलिसांकडे करणार आहेत.वाहने टोईंग करताना नुकसान झाले तरी सुद्धा हे टोईग करणारे बॉय नाही म्हणतात त्यामुळे वाहने उचलतानाचे पुर्ण शुटिंग करावे आणि वाहन न्यायला आलेल्या चालकाला हे शुटिंग दाखविण्यात यावे म्हणजे या कामामध्ये पारदर्शकपणा येईल.अशी मागणी येथील कार्यकर्ते सोहित बनकर यांनी पोलिसांकडे केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)