– चौदाव्या फेरीअखेर 11 हजारांची आघाडी
पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी बाजी पलटी केली आहे. शिवसेनेचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार यांची आघाडी मोडून काढत चौदाव्या फेरीअखेर 11 हजारांची आघाडी घेतली आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघात आजी-माजी आमदारांमध्ये लढत आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे अॅड. गौतम चाबुकस्वार यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह 18 उमेदवार रिंगणात आहेत. पिंपरीत 50.17 टक्के मतदान झाले आहे. 1 लाख 77 हजार 387 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.
बालेवाडीतील मतमोजणी केंद्रावर सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीद्वारे पिंपरीच्या मोजणीला सुरुवात झाली. 499 टपाली मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममवरील मतांची मोजणी सुरु झाली. या मतदार संघात 399 केंद्र आहेत. प्रत्येक टेबलवर 20 केंद्र याप्रमाणे 20 टेबलांवर मोजणी होत आहे. मतमोजणीच्या 20 फेर्या होणार आहेत. पहिल्या सहा फेरीअखेर गौतम चाबुकस्वार आघाडीवर होते. मात्र, सातव्या फेरीपासून अण्णा बनसोडे यांनी जादुई आघाडी घेतली. चौदाव्या फेरीअखेर तब्बल अकरा हजार मतांची आघाडी घेतली आहे.
Lay bhari saheb.