– पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम
प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.13- यापूर्वी शिवाजीनगर पोलीस मैदानात होणारी पोलीस परेड आता शहरातील विविध शाळांच्या मैदानावर होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्कर्ष स्कुलमध्ये शुक्रवारी झाली.
लष्कर पोलीस हद्दीतील सेंट ऍन्थोनी हायस्कुल येथील शाळेच्या ग्राऊंडवर सिरमोनीयल परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी परेडची मानवंदना स्वीकारली. यावेळी परेड कमांडर म्हणून सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ, सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक गोटमवाड यांनी काम पाहिले.
परेडसाठी पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 12 पोलीस उपनिरीक्षक व 125 कर्मचारी हजर होते. परिमंडळ-2 मधील दोन प्लाटून, मुख्यालयाकडील 1, वाहतूक शाखेकडील 1 असे चार प्लाटून नेमण्यात आले होते. सकाळी 7.30 वाजता परेड मार्च झाली आणि…….45 वाजता समाप्त करण्यात आली. यामध्ये सेंट ऍन्थोनी हायस्कुल सोलपूर बाजार व उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कुल या दोन्ही शाळांचे सुमारे हजार ते 1,200 विद्यार्थी व शिक्षक हजर होते. यादरम्यान परेडचे महत्त्व पोलीस उपायुक्तांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
उपक्रमाचे महत्त्व काय?
पोलीस गणवेशाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे, पोलीस आपल्या सुरक्षेसाठी असल्याची भावना निर्माण करणे व नवीन पिढी गुन्हेगारीपासून दूर ठेवणे या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला.