पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; बंडगार्डन पोलिसांची कारवाई

पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; बंडगार्डन पोलिसांची कारवाई
पुणे,दि.13- अवैध्यरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे पिस्तूलासह जिवंत काडतूसही मिळून आले आहे.
शगुन जोगदंड(24,रा.ताडीवाला रस्ता) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील शगुन जोगदंड हा गुन्हेगार आहे. तो पिस्तुल घेऊन ताडीवाला रस्ता परिसरात फिरत असल्याची खबर पोलीस कर्मचारी निखील जाधव व कैलास डुकरे यांना मिळाली होती. तो पिस्तुलाचा वापर करुन एखादा गंभीर गुन्हा करण्याची शक्‍यता लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे यांना याची खबर देण्यात आली. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे व पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. तपास पथकाचे पोलीस हवालदार संतोष पागार, नवनाथ डांगे, हरीश मोरे, पोलीस नाईक अय्यज दड्डीकर, कैलास डुकरे, रुपेश पिसाळ, पोलीस शिपाई निखील जाधव, किरण तळेकर यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे पिस्तुल आणी एक काडतूस आढळले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.